Printed from
The Maharashtra Times -Breaking news, views. reviews, cricket from across India
विदर्भात ४८ तासात सहा शेतक-यांच्या आत्महत्या-Maharashtra Times
Jan 20, 2013, 12.00AM IST
म . टा . प्रतिनिधी , नागपूर
नापिकी आणि कर्जाच्या डोंगरामुळे विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून गेल्या४८ तासांत सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या . नववर्षातील १८ दिवसात जीवन यात्रासंपवणाऱ्यांची शेतकऱ्यांची संख्या १६ झाल्याचा दावा विदर्भ जनआंदोलन समितीने केला आहे .
अमरावती जिल्ह्यातील नामदेव ठोके , जानराव नागले , यवतमाळ जिल्ह्यातील बालाजी ठवरी आणिचंद्रपूर जिल्ह्यातील दिनकर नवरखेडे , रामदास गोहणे व गजाजन राऊत यांनी आत्महत्या केल्या .पाच दिवसांपूर्वी संक्रांतीच्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील पुरुषोत्तम पुसदकर , रामराव शेंडे आणिसंजय मोहुर्ले या शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले . सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी शेतकरीविधवा यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथे २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन काळा दिवस म्हणूनपाळणार असल्याचे , समितीचे नेते किशोर तिवारी यांनी जाहीर केले .
बीटी कॉटन अपयशी ठरल्याची बाब प्रशासनाने सरकारपासून मुद्दाम लपवून ठेवली आहे . ४० लाख२० हजार हेक्टरमधील कापसाचे बहुतांश पीक धोक्यात आले आहे . त्याचबरोबर हमी भावापेक्षाकमी बाजारभाव असल्यानंतरही सरकारने त्याची अद्याप दखल घेतलेली नाही . त्यामुळे मिळेल त्याभावात कापूस विकण्यात येत आहे . या स्थितीत नैराश्य आलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्गपत्करला आहे . सरकारने तातडीने कापसाच्या भावाकडे लक्ष देणे आवश्यक असून शेतकऱ्यांनामदत करण्याची गरज आहे . संवेदनशील नागरिकांनीदेखील ५० लाख शेतकऱ्यांना नवसंजीवनदेण्यासाठी समोर यावे , असे आवाहनही किशोर तिवारी यांनी केले आहे .
राज्यकर्ते व प्रशासन ' अॅडव्हांटेज विदर्भ ' च्या तयारीला लागले आहे . भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षनितीन गडकरी ' अॅग्रो व्हिजन ' मध्ये व्यस्त आहेत . या कार्यक्रमांवर कोट्यवधी रुपये खर्चहोणार आहेत . मात्र एकही मंत्री किंवा विरोधी पक्ष नेत्यांनी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची भेटघेतली नाही . हिवाळी अधिवेशनातही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली नाही , हे दुर्दैव असल्याचीटीका किशोर तिवारी यांनी केली आहे .


No comments:
Post a Comment