Sunday, May 20, 2012

‘सत्यमेव जयते'मध्ये वैदर्भीय शेतकरयांच्या व्यथा

‘सत्यमेव जयते'मध्ये  वैदर्भीय शेतकरयांच्या व्यथा
नागपुर -२० में २०१२
सामाजिक प्रश्नांना वाचा फोडून सरकारला त्याची दखल घ्यायला भाग पाडणारया आमीरखान याच्या ‘सत्यमेव जयते' या मालिकेत रविवार, २० मे रोजी वैदर्भीय शेतकरयांच्या व्यथा मांडण्यात आल्या .या भागाच्या निर्मितीसाठी वैदर्भीय शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी आमीरला विशेष सहकार्य केले होते .
 सावकारी पाश, हुंडा व लग्नावर होणारा खर्च हे शेतकरयांच्या दुरावस्थेला कारणीभूत असलेल्या कारणांवरही या कार्यक्रमात प्रकाशझोत टाकण्यात  आला .केळापूर तालुक्यातील साखरा येथील सावकारी पाशाने सावकाराच्याच घरासमोर आत्महत्या करणारया बाळकृष्ण आष्टेकरयांच्या उषा नामक मुलीचीही व्यथा यात मांडली गेली . उषाला हुंड्यासाठी सासरच्यांनी त्रास दिल्याने तिला कायमचे माहेरी यावे लागले आहे.
‘सत्यमेव जयते'च्या यापूर्वीच्या दोन भागांत आमीरने स्त्रीभ्रूण हत्या आणि बाललैंगिक शोषण या दोन मुद्यांवर प्रकाश टाकला होता. या मालिकेत आज हुंडा या समस्या   दाखविले आली आहे , तसेच बँडबाजा बारात आणि भोजनावळीला फाटा देऊन कोणताही खर्च व हुंडा न देता घडणारया विवाहांचाही या कार्यक्रमात समावेश करण्यात येणार होता .

No comments: